ऊसाच्या फडात अनिता बाळंत झाली. तिने पाचटातच बाळाला जन्म दिला. आणि दुसऱ्या दिवशी ती तान्ह्या बाळाला घेऊन कामाला निघाली…
ऊसतोड कामगार केवळ त्यांची गरिबी, खालच्या स्थराचा सामाजिक दर्जा, दुष्काळ परिस्थितीमुळे ओढवलेली असुरक्षितता यांमुळे साखरेच्या पट्ट्यांत स्थलांतर करतात. असे करून ते त्यांचे जगणे सुरक्षित करत असतात. ऊसतोड करून ते आर्थिकदृष्ट्या सबळ होत नाहीत, तर ही केवळ त्यांची जगण्यासासाठी केलेली धडपड असते. सर्वप्रथम ऊसतोडीचे काम गर्भवती किंवा प्रसूत झालेल्या महिलांनी करावे की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले पाहिजे.......